नागपूर – औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरणाला शिंदे सरकारने स्थगिती दिल्यावरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत संतापले आहेत. त्यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राऊत म्हणाले की, शिवसेनेला विरोध करण्यासाठी नामांतराला स्थगिती दिली आहे. औरंगजेब नातेवाईक तुमचा कधीपासून झाला, औरंगजेब हा कोण लागतो, हा उस्मान कोण लागतो त्यांच्या नामांतराला स्थगिती का देता? असे प्रश्न राऊतांनी यावेळी उपस्थित केले .
खासदार संजय राऊत सध्या नागपूर दौर्यावर आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ठाकरे सरकराने औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील नाव देण्याचा प्रस्तावर मंजुर केला. आणि हे तिन्ही निर्णय स्थगित केले असेल तर हे सरकार हिंदूत्वद्रोही आणि महाराष्ट्र द्रोही आहे. त्यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे. खरतंर स्थगितीबाबत फडणवीसांना विचारायला हवं कारण शिंदेंच्या हातात काहीच नाही. औरंगाबादचे संभाजीनगर कधी करताय हा प्रश्न भाजप करत होते. धाराशीव विषयीही त्यांची तिच भूमिका होती. आणि दी. बा. पाटील यांच नाव द्यावर त्यासाठी हेच लोक मोर्चे काढत होते. उद्धव ठाकरे यांनी केंद्राचा न विचार करात मोठ्या हिंमतीने एका हिंदूत्ववादी भूमिकेतून नामांतराचा निर्णय घेतला. मग आता स्थगिती.