संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

औरंगाबादच्या ‘त्या’ रंगेल किर्तनकाराला अखेर अटक! न्यायालयात मिळाला जामीन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

औरंगाबाद – गेली अनेक वर्षे औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात प्रतिष्ठीत किर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल म्हणून ओळख असलेल्या या महाराजाचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ ९ एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र अखेर काल या महाराजाला शिल्लेगाव पोलिसांनी अटक करून गंगापूर न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने या महाराजाला जामीन मंजूर केला.

हे महाराज आणि व्हिडीओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात. त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे. दोघांचे युट्यूबवर लाखो फॉलोअर्सवर आहेत. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्या भक्तांना मोठा धक्का बसला असून संतापाची लाट उसळली. या किर्तनकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओमध्ये असलेल्या किर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी रितसर तक्रार दिली होती. अखेर काल पोलिसांनी या महाराजाला ताब्यात घेतले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रसिद्ध कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडिओतील महिला किर्तनकाराने बदनामीला घाबरून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. औरंगाबादेतील एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले होते. गेली अनेक वर्षे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले ४८ वर्षीय कीर्तनकार आणि सिल्लोड तालुक्यातील चाळीस वर्षीय महिला कीर्तनकार या अश्लील व्हिडीओ क्लिपमध्ये नको त्या अवस्थेमध्ये दिसत आहेत.हा व्हिडिओ या महाराजांनी स्वत:च चित्रित केल्याचेही या चित्रफितीमध्ये पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे दोन व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. या व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणारी महिला ही देखील महाराज आहे ती ज्या परिसरात राहते त्या परिसरात अनेक लोक तिला मानतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. तर दोघांचे युट्यूबवर मोठे फॉलोअर्सवरसुद्धा आहेत. मात्र त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्या भक्तांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami