संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

औरंगाबादमधील गायब झालेली यूटयूबर मध्य प्रदेशात सापडली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद : औरंगाबादमधील प्रसिद्ध युट्युबर मुलगी ‘बिनधास्त काव्या’ शुक्रवारपासून बेपत्ता झाली होती. मध्यप्रदेशमध्ये या यूट्यूबरचा शोध लागला असून इटारसी ते भोपाळ दरम्यान आरपीएफ पोलिसांनी हा शोध लावला आहे. बिनधास्त काव्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली होती.

औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध युट्यूबर बिनधास्त काव्या शुक्रवारपासून अचानक बेपत्ता झाली होती. मित्र-कुटुंबीयांकडे तिची विचारपूस केली असता कुठेही तिचा पत्ता लागला नाही. काव्याने कमी वयात यूटयूबवर यशस्वी भरारी घेतली. तिचे लाखो फॉलोअरर्स आहेत. शुक्रवारी ती घरी परतली नसल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केली. पण तिचा काहीच पत्ता लागला नाही.अखेरीस पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पण, पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला होता. आपल्या मुलीचा लवकरात लवकर शोध लागावा अशी विनंती तिच्या पालकांनी केली होती. मात्र ही बिंनधास्त काव्या रागाच्या भरात शुक्रवारी दुपारी घरातून बाहेर पडली होती. ही मुलगी 16 वर्षांची असून अभ्यासाच्या कारणावरुन घरी वाद झाला होता. त्यानंतर शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या शोधकार्यानंतर मध्यप्रदेशमध्ये यूट्यूबरचा शोध लागला. इटारसी ते भोपाळ दरम्यान आरपीएफ पोलिसांना काव्याला शोधण्यास यश मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami