संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

औरंगाबादमध्ये मनसेकडून ‘पाणी संघर्ष यात्रा’ काढली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

औरंगाबाद- औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून मनसेने आज पाणी संघर्ष यात्रा काढली. मनसेचे कार्यकर्ते आज शहरात हातात हंडे घेऊन फिरत होते आणि हंड्यात सामन्याच्या तक्रारींच्या चिठ्ठ्या गोळा करत होते. मनसेचे आजचे आंदोलन हे भाजपाच्या पाठिंब्याचे असल्याचे बोलले जात असून मनसे पाठोपाठ आता भाजपा ही पाण्याबाबत आंदोलन करणार आहे. पाणी प्रश्नांवर 23 मे रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य असा मोर्चा काढणार आहे. मात्र औरंगाबामधील  पाणी टंचाई ही समस्या जुनी असून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही येथे पाण्याची तीव्र टंचाई होती.
तेव्हा पाणी प्रश्नाकडे भाजपाने लक्ष दिले नसल्याचे बोलले जाते. शहरातील अनेक भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मनसेकडून आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील टीव्ही सेंटर भागातील पवन नगर येथून ‘पाणी संघर्ष यात्रा’ काढण्यात आली. यावेळी मनसेच्या पदाधिकऱ्यांनी घरोघरी जाऊन पाणी समस्याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र लिहण्याचे आवाहन केले. तसेच संपूर्ण शहरातून तब्बल 25 हजार पत्र जमा करून मुख्यमंत्री यांना पाठवणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली आहे. औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून भाजपकडून 23 मे रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पैठण गेट ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत भव्य असा मोर्चा काढला जाणार असून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे.भाजपाचे म्हणणे आहे की,गेल्या 22 वर्षांपासून औरंगाबाद महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पण तरीही एवढ्या वर्षात पाणी प्रश्न सुटला नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami