संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

औरंगाबादमध्ये शिवसेनेला फटका! 12 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा विजय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद – औरंगाबादमधील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसला. औरंगाबादेतील एकूण 16 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतींवर एकनाथ शिंदे गटाच्या पॅनलचा विजय झाला, तर 2 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला. अपक्ष उमेदवारांच्या हाती 2 ग्रामपंचयाती लागल्या आहेत. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना साधा भोपळा फोडता आला नाही.

या जिल्ह्यातील सर्वात मोठी वडगाव-कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीवर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचे पॅनल विजयी झाले. ही ग्रामपंचायतदेखील शिंदे गटाकडे आली. आगामी निवडणुकांसाठी या निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे मानले जात आहे. सिल्लोडचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तारांच्या विधानसभा मतदार संघातील तीनपैकी 2 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने विजयी मिळवला. नानेगाव आणि जंजाळ या दोन ग्रामपंचायत अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आल्या आहेत. पैठण तालुक्यातील सात पैकी 6 ग्रामपंचायतींवर एकनाथ शिंदे गटाचा विजय झाला आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी येथील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोरदार प्रचार केला होता. तालुक्यातील आपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावतांडा या ग्रामपंचायतींवर भुमरे पुरस्कृत पॅनलचा विजय झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami