औरंगाबाद: जुन्या सोलापूर धुळे मार्गावर जायचे म्हटले की,नागिरकांच्या अंगावर काटा यायचा. कारण इथे अपघातांचे प्रमाण अधिक होते. मात्र आता सोलापूर धुळे मार्गामुळे येथील विकासास चालना मिळणार आहे. मोठमोठे उद्योजक येथे याच भागात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे औरंगाबादेत जुन्या बायपासला समांतर नवीन ‘बायपास’मुळे येथील विकासाला अधिक गती मिळाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या सोलापूर-धुळे मार्गामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे.
आता जुन्या बायपासला समांतर नवीन बायपास झाल्यामुळे निपाणी फाटा ते करोडीपर्यंत अशा ३० कि.मी.च्या पट्ट्याचा अतिशय वेगाने विकास होत आहे. यामुळे नवनवीन गुंतवणूकदार याच पट्ट्यात गुंतवणूक करीत असून येत्या एक वर्षात नव्यासह जुन्या बायपासवर मोठमोठे हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने, वाहनांचे शोरूम तसेच गृहनिर्माण प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. दरम्यान, कोरोनामुळे संथ गतिने सुरु झालेला या विकासाच्या गतीने स्पीड घेतल्याने येथे समृद्धी आणि विकास नवा बायपास बघायला मिळणार आहे. दरम्यान, जुन्या सोलापूर धुळे मार्गावर जायचे म्हटले की, नागिरकांच्या अंगावर काटा यायचा. मात्र आता जुन्या बायपासच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरण पूर्णत्वास जात आहे. जुन्या बायपासला समांतर नवीन बायपास झाल्यामुळे तयार झालेल्या ट्रँगलमध्ये सध्या कोट्यवधींची गुंतवणूक केली जात आहे. येथील मोठमोठे उद्योजक यात आहेत. भैगोलिक दृष्ट्या विकासाला लागणाऱ्या सर्व गोष्टी या परिसरात उपलब्ध आहेत. तसेच सोलापूर धुळे या जुन्या बायपासमध्ये रुंदीकरण होत आहे. त्यामुळे भविष्यात सर्वच व्यवसायाला चालना मिळणार आहे. तसेच मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर उड्डाण पूल झाल्यास नागरिकांना बायपासचा थेट कनेक्टिव्हीटी मिळवून देणारा हा बायपास आहे. या नवीन बायपासमुळे विकासाला हायस्पीड मिळणार आहे.