संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

औरंगाबाद विमानतळावर बेवारस बँगमुळे खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद – औरंगाबादेच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंगमध्ये बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफच्या क्यूआरटी पथकाने बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये दिरहम, डॉलर आणि भारतीय रक्कम असे एकूण 90 हजार रुपये, पासपोर्ट आढळून आले. त्यात कोणतीही धोकादायक वस्तू सापडली.
बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता विमानतळावरील पार्किंगमध्ये बेवारस बॅग सापडली. याची माहिती उपनिरीक्षक मनोजकुमार आणि कंट्रोल रुमला देण्यात आली. त्यानंतर डेप्युटी कमांडंट पवनकुमार यांच्या उपस्थितीत बॅगची तपासणी करण्यात आली. त्यात 20 हजार 500 रुपये भारतीय मुद्रा, 861 डॉलर, 115 दिरहम, 9 पासपोर्ट, 7 डेबिट, क्रेडिट कार्ड होते. बोर्डिंग पासवरून विमान प्रवाशाशी संपर्क साधून त्यास विमानतळावर बोलावण्यात आले. या प्रवाशाला सीआयएसएफने बॅग परत केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami