सिंधुदुर्ग – एसटी कर्मचार्यांच्या संपकाळात सेवा दिलेल्या कंत्राटी एसटी चालकांना सेवेत मुदतवाढ द्या, अशी मागणी कोकण पर्यटन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे केली.
एसटी कर्मचार्यांच्या संपकाळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनातर्फे नाशिक येथील ’अस्तित्व मल्टिपर्पज प्रा.लि. एजन्सीच्या’ माध्यमातून कंत्राटी चालकांची नियुक्ती केली गेली. या चालकांच्या सेवेची मुदत 15 जूनला संपली आहे. परिणामी संपकाळात जीवावर उदार होऊन काम करणारे हे कर्मचारी आता बेरोजगार होणार असल्याने त्यांच्या सेवेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणीे संदेश पारकर यांनी एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे केली.
रसाळ यांनीही या चालकांना 27 जूलैपर्यंत मुदतवाढ देत असून त्यांच्या अन्य मागण्याही शासनस्तरावर पोहोचविणार असल्याचे आश्वासन पारकर यांना दिले. यावेळी कंत्राटी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.एसटी संपकाळात अस्तित्व एजन्सीच्या माध्यमातून 77 चालकांना नियुक्ती देण्यात आली होती. त्यातील 22 चालक सध्या कार्यरत आहेत.