कोलकाता – ‘कच्चा बादाम’ या गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावलेल्या गायकाचा कार अपघात झाला आहे. गायक भुबन बड्याकार याचा पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भुबनच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. भुबनने नुकतीच एक कार खरेदी केली. तो आता कार चालवायला शिकत होता. तेवढ्यातच हा अपघात झाला. भुबन बड्याकर पश्चिम बंगालमध्ये शेंगदाणे विकायचे काम करतो. शेंगदाणे विकता विकता तो कच्चा बादाम हे त्याचं गाणं गायचा. सोशल मीडियावर हे गाणं लोकप्रिय होऊन व्हायरल झालं. त्यानंतर भुबन बड्याकर लोकप्रिय झाला. भुबन बड्याकर हा मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आहेत. दुबराजपूर ब्लॉक अंतर्गत कुरलजुरी गावात त्याचं घर आहे. भुबन याच्या पश्चात पत्नी, २ मुले व १ मुलगी असा परिवार आहे. शेंगदाणे विकून त्याची २०० ते २५० रुपयांची दिवसाची कमाई होती. पण आता लोकप्रिय झाल्यावर त्याने शेंगदाणे विकणे बंद केले आहे. घरातील तुटलेल्या वस्तूंच्या बदल्यात तो शेंगदाणे विकतो हे विशेष. तो शेंगदाणे विकण्यासाठी दूरच्या गावीही जायचा. दररोज ३ ते ४ किलो शेंगदाणे विकून २०० – २५० रुपयांपर्यंत भुबन कमाई करायचा. मात्र, हे गाणं व्हायरल झाल्यानंतर त्याची कमाई वाढली आहे.