कडेगांव, खानापूर आणि कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक; १ डिसेंबरपासून अर्ज

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

सांगली – राज्यातील ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १ ते ७ डिसेंबर अशी असणार आहे. जाहीर झालेल्या या निवडणुकांमध्ये सांगली जिल्ह्यातील कडेगांव, खानापूर आणि कवठेमहांकाळ या तीन नगरपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांची घोषणा राज्य निव्वळ आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी काल बुधवारी केली. राज्यात गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतरची ही सर्वांत मोठी राजकीय लढाई असणार आहे.

या निवडणुकांसाठी मतदान २१ डिसेंबर रोजी, तर मतमोजणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे. संबंधित नगरपंचायत क्षेत्रात कालपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी १ ते ७ डिसेंबर दरम्यान अर्ज स्वीकारले जातील. तर ४ आणि ५ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्जांची छाननी ८ डिसेंबरला होईल. मग त्यानंतर २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सांगलीतील कडेगाव, खानापूर आणि कवठेमहांकाळसह अन्य जिल्ह्यातील नगरपंचायतींमध्ये रत्नागिरी-मंडणगड, दापोली.सिंधुदुर्ग, कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ.पुणे–देहू (नवनिर्मित), सातारा-लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी.सोलापूर–माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), आदींचा समावेश आहे. आता या सर्व निवडणुकांमध्ये आघाडीतील तीन मित्रपक्ष एकत्र लढणार की, स्वबळावर दंड थोपटणार, हे स्पष्ट होणार आहे. एप्रिल २०२० ते मे २०२१ या काळातील मुदत संपलेल्या ८१ आणि डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणार्‍या १८ तसेच नवनिर्मित ६ अशा एकूण १०५ नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ सदस्यपदांच्या निवडीसाठी मतदान होईल.

Close Bitnami banner
Bitnami