संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

कणकवलीतील इमारतीचे 10 फ्लॅट फोडल्याने खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिंधुदुर्ग- कणकवली शहरात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ सुरु झाला आहे असून एकाच इमारतीमधील 10 फ्लॅट फोडून चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमघ्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
कणकवली शहारातील मराठा मंडळ रस्त्यावर क्रिस्टल रेसीडेन्सी या इमारतीत मध्यत्रीच्या सुमारास चोरांना शिरकाव केला. कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. काही रहिवासी जागे झाले. त्यांनी त्यांच्या घरातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी फ्लॅटना बाहेरून कडी घातली होती.यावेळी चोरट्यांनी दरवाजा तोडताना आवाज आल्याने काही नागरीकांनी आरडाओरड केली. त्यानंतर चोरटे पळून जात असताना काही लोकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावर विटा देखील भिरकावल्या. दरम्यान चोरी करताना एकूण तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सध्या घटनास्थळी कणकवली पोलीस श्वान पथकाच्या साह्याने घटनेचा तपास करीत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami