संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

कणकवली शहरातील उड्डाणपूल
दोन महिने वाहतुकीसाठी बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कणकवली- शहरातील उड्डाणपूल मागील दोन वर्षांपासून खचत चालला होता.त्यामुळे या खचलेल्या भागाची लवकरच दुरुस्ती केली जाणार आहे.या उड्डाणपुलाची दुरुस्ती होणार असल्याने पुढील दीड ते दोन महिने हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.त्याकाळात या उड्डाणपुलावरील वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळवली जाणार आहे.त्यामुळे शहरात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.
कणकवली शहरातील उड्डाणपुलाचा शेवटचा पिलर ते एस.एम.हायस्कूल समोरील बॉक्सवेल पर्यंतचा जोडरस्ता काढून टाकला जाणार आहे.त्यानंतर त्याठिकाणी प्लेट उभे करून नवा रस्ता बांधला जाणार आहे.या कामासाठी किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे.महामार्ग चौपदरीकरणात शहरातील जानवली नदी पूल ते एस.एम.हायस्कूलपर्यंत सिमेंटचे छोटे बॉक्स ठेवून जोडरस्ता तयार करण्यात येणार आहे.मात्र उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच वर्षीच्या पावसाळ्यात सिमेंटचे बॉक्स आणि भरावाची माती बाहेर पडून उड्डाणपूल खचला होता.दुसऱ्या वर्षी पावसाळ्यातही उड्डाणपूल खचला होता.
त्यामुळे पुढील दोन वर्षापासून खचलेला जोड रस्ता काढून सिमेंट बॉक्स ऐवजी प्लेट लावून जोडरस्ता तयार केला जाणार आहे.जानवली नदी ते एस.एम. हायस्कूलपर्यंतचा जोडरस्ता अरुंद आहे.तर त्यापुढील सर्व्हिस रोड म्हणजेच सेवा रस्त्यावर दुचाकी,तीनचाकी आणि चार चाकी वाहने कुठेही उभी केली जातात.उड्डाणपुलाची वाहतूक दुरुस्ती काळात सर्व्हिस रोडवर वळविण्यात येणार आहे.त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. शहरातील उड्डाणपूल जोडरस्त्याची उंची पाच मीटरपेक्षा जास्त आहे.त्यामुळे पुढील काळातही रस्ता खाण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील जोडरस्ता न करता उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधीनी केली होती.तसेच महामार्ग विभागानेही त्यासाठी केंद्राकडे ४० कोटींचा आराखडा पाठविला होता.त्यामुळे हे प्रस्तावित विस्तारीकरण मात्र काही होऊ शकलेले नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami