मुंबई- -एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी, खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यामुळे जो वाद निर्माण झाला आहे,तो आता अधिकच तीव्र होणार आहे . कारण काँग्रेसने जीनांच्या कबरीचे दर्शन घेणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांच्यावर काय कारवाई केली ते अगोदर सांगावे .असा सवाल भाजपला केला आहे . त्यामुळे हा वाद अधिकच चिघळणार आहे. .
अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद दौऱ्यात, औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शन घेतले होते. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली होती. शिवसेना, भाजप, मनसे तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी ओवेसींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. एकीकडे अकबरूद्दीनवर कारवाईची मागणी केली जात असताना काँग्रेसचे माजी प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र ट्विट करून भाजपलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. . सचिन सावंत यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे कि औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसी गेले तर बोंब ठोकून कारवाईची मागणी करणाऱ्या भाजपने व भाजपच्या पिट्टूनी,अगोदर जीनांच्या कबरीवर गेलेल्या अडवाणींवर, कोणत्या आयपीसीच्या कलमानुसार कारवाई केली ते सांगावे? तर भाजपचे सहयोगी नितीशकुमार याना जेलमध्ये का नाही टाकले याचेही उत्तर द्यावे. ते पुढे म्हणाले कि मरणांती वैरणी हि आपली संस्कृती आहे. शिवरायांनी अफझल खानाचीही कंबर बांधली. अंधाराची पूजा करणारे असतातच !गोडसेंचा उदोउदो करणारे आहेतच कि भाजपमध्ये त्यांना जेलमध्ये टाकता का ? असा सवाल त्यांनी केला सोबतच त्यांनी म्हटलेय कि ओवेसींचा धर्मांध विचार देशाला ठाऊक आहे. आम्ही भाजपबरोबर त्यांचा विरोध करतो. पण भाजप मात्र त्यांचा वापर करतेय असे सावंत यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.