मुंबई – मुंबईच्या धारावीतील कमला नगर येथील झोपडपट्टीत आज भीषण आग लागली. आग इतकी मोठी होती की आगीचे लोट बाहेर पडत होते. या भीषण आगीत २५ हून अधिक घरे जळून खाक झाली. दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. त्यामुळे यात कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व आगीवर नियंत्रण मिळवले. धारावीतील कमला नगर झोपडपट्टीमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनस्थळी तातडीने दाखल झाल्या. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी आल्या. दरम्यान नागरिक झोपेत असताना अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.