संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

करमुसे मारहणप्रकरणी आव्हाडांना झटका! सुप्रीम कोर्टात 25 नोव्हेबरपासून सुनावणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- 2020 च्या अनंत करमुसे मारहणप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना झटका बसला आहे. त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल केली असून या याचिकेवर आता 25 नोव्हेबरपासून सुनावणी सुरु होणार आहे.

याआघी अभियंता अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण केल्याचे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्याची मागणी मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली होती. त्यानंतर आता अनंत करमुसे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. ती याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली असून कोर्टाने याप्रकरणाची सुनावणी 25 नोव्हेबरपासून घेण्याचे ठरले. दरम्यान, ठाण्यात राहणाऱ्या अभियंता अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 रोजी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षा रक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी त्याचे अपहरण करत आव्हाडांच्या घरी नेल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी आव्हाडही घरी होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना करमुसे यांना बेदम मारहाण केली होती, असा आरोप करण्यात आला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami