संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

कर्जत येथील रायगड जिल्हा बँकेला आग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कर्जत :- शहरातील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आज पहाटे आग लागली होती. आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. कर्जत नगरपरिषदेचे अग्निशमन दल, तसेच खोपोली येथील अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. उशिरापर्यंत कुलिंगचे काम चालू होते.

शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकातील श्री कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या मजल्यावर ही बँक आहे. ही आग पहाटे चार ते पाचच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात लागल्याचे बोलले जात आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरत एकाच खळबळ उडाली होती. पहाटे सुमारास ही आग लागल्याने यावेळी नागरिक गाढ झोपेत होते. तर कामाला जाणाऱ्या नागरिकांना ही आग दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत बँक पूर्ण जळून खाक झाली आहे.आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसून प्रथम दर्शनी ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या