पुणे:- मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित यांच्यावर स्मिता मिश्रा यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या विरोधात पुण्यातील पुरोगामी संघटनांनी जोरदार आंदोलन केले. भीम आर्मी बहुजन एकता आणि मूलनिवासी मुस्लिम मंच या दोन संघटनांकडून टिळक स्मारक मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नल पुरोहित यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
भीमआर्मी बहुजन एकता मिशन अध्यक्ष दत्ता पोळ आणि मूलनिवासी मुस्लिम मंच अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी स. पा. महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून हा कार्यक्रम महाविद्यालयात घेऊ नये अशी मागणी केली होती. परंतु पुरोगामी संघटनांचा विरोधत झुगारुन पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मात्र यावेळी अनेक पुरोगामी संघटनेच्या कार्यक्रम स्थळी जाऊन जोरदार निदर्शने केली. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी ले. कर्नल पुरोहित यांच्यावरील पुस्तक रद्द करा, अशी पुरोगामी संघटनानी केली आहे.या पुस्तकाचे प्रकाशन हे जयंत उमराणीकर, सत्यपाल सिंग याच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शरद पोंक्षे यांची देखील उपस्थितीत राहिले होते. दरम्यान, कार्यक्रमस्थळी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे पुणे पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल स्वतःहा कार्यक्रमस्थळी उपस्थितीत होते.
कर्नल पुरोहित मालेगावमध्ये झालेल्या सन २००८ मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. त्यामध्ये ६ जण मरण पावले. १०० पेक्षा जास्तजण जखमी झाले. लष्करी सेवेत असताना अशा प्रकारच्या कृत्यात सहभागी असण्यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. गुन्हेगारी कायद्यातील अन्य कलमांतंर्गत गुन्हेही त्यांच्यावर आहेत. हे सर्वच प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.