संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

कर्नाटकातील काही मंदिरात होणार
सलाम एवजी आता संध्या आरती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मंगलुरु- कर्नाटकातील काही मंदिरातील सलाम आरतीचे नाव बदलून आता ती संध्या आरती म्हणून ओळखली जाणार आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.सलाम आरतीचे नाव बदलण्याची मागणी हिंदू संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती.त्यानंतर हिंदू मंदिरांवर देखरेख करणारे धर्मादाय एंडॉमेंट्स विभागाने शनिवारी सहा महिन्यांच्या जुन्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हिंदू धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभाग आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अंतिम मंजुरीची प्रतिक्षेत आहेत .
मेलकोटे येथे ऐतिहासिक चालुवनारायण स्वामी मंदिर आहे. जिथे हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या कारकिर्दीपासून रोज संध्याकाळी ७ वाजता सलाम आरती (मशाल सलाम) होत आहे. विद्वान आणि कर्नाटक धार्मिक परिषदेचे सदस्य, कशेकोडी सूर्यनारायण भट यांनी त्याचे नाव बदलण्याची मागणी केली. भट म्हणाले होते की, सलाम हा शब्द टिपूने दिला होता. हा शब्द आमचा आमचा नाही.मंड्या जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एंडॉमेंट्स विभाग यांना सादर केला होता.हिंदू धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभाग आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा करत आहे. केवळ मेलकोटमध्येच नव्हे तर कर्नाटकातील सर्व मंदिरांमध्ये आरती सेवांचे नाव अधिकृत आदेशानंतर बदलले जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami