बेंगळुरू- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आज सकाळी माजी मुख्यमंत्री बीएस यडियुरप्पा यांचे सहकारी आणि भाजपचे समन्वयक एचडी थिमय्या यांनी भाजपला रामराम ठोकत अधिकृतपणे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. थिमय्या हे चिक्कमंगळुरू मतदारसंघातील लिंगायत समाजाचे नेते आहेत.
आज बेंगळुरू येथील काँग्रेस प्रदेश कार्यालयात थिमय्या यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचा हात धरला. त्यांच्या प्रवेशामुळे चिक्कमंगळुरू मतदारसंघात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. चिक्कमंगळुरुमध्ये 15 हजार वोक्कलिगा आणि 40 हजारांहून अधिक लिंगायत समाजाची मते आहेत. मात्र, आता थिमय्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यामुळे भाजपची लिंगायत मते फुटण्याची शक्यता आहे