संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

कर्नाटकात बजरंग दल कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बंगळुरू – कर्नाटकातील शिमोगामध्ये काल, रविवारी रात्री एका २६ वर्षीय बजरंग दल कार्यकर्त्याची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. हर्षा असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. हत्या करण्यात आलेल्या शिमोगा जिल्ह्यात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हर्षा गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. या हत्येनंतर शिमोगा जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिजाबविरोधी पोस्ट केल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. दरम्यान, शिमोगा शहरातील सीगेहट्टी परिसरात अनेक वाहने जाळण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. कर्नाटक सध्या हिजाब वादाचे केंद्रबिंदू ठरला आहे. शिमोगा येथे सातत्याने आंदोलने होत आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून काही काळ कलम १४४ ही लागू करण्यात आले होते. ही हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हा हल्ला कोणी केला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अस्पष्ट आहेत. कर्नाटकात हिजाबवरून वाद सुरू झाल्यापासून बजरंग दलाने सक्रिय भूमिका बजावली आहे. अशा स्थितीत या हत्येनंतर उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. काहीजण या हत्येला हिजाबच्या वादाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami