बेळगाव : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर दोन्ही राज्यांकडून बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र आजपासून ही बस सेवा पुन्हा दोन्ही राज्यांकडून सुरु करण्यात आली आहे. बेळगावहून कर्नाटक सरकारची बस पुण्याला रवाना झाली आहे.
कर्नाटक सरकारची बेळगाव-पुणे ही बस सेवा आणि गेल्या काही दिवसापासून जी बस सेवा बंद करण्यात आली होती ती सेवा आता पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र ही बस बेळगावहून निघाल्यांनंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरात जाणार नाही. तर कोल्हापूर बायपास मार्गे पुढे सातारा आणि पुण्याकडे रवाना होणार आहे.
हा प्रवास सुरक्षित होईल विश्वास चालक आणि प्रवाशांकडूनही व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. सगळे काही शांत झाल्याचा विश्वास चालकांना आहे. विशेषतः कानडी आणि मराठी असा कोणताही वाद नाही. मात्र हे सगळं राजकीय दृष्टिकोनातून घडवून आणले जात असल्याच्या प्रतिक्रिया येथील प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.