संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय! एससी/एसटीचे आरक्षण वाढवणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बेंगळुरू- कर्नाटकातील भाजपच्या सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी काही महिने अगोदर मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणात सरकार वाढ करणार आहे. न्यायमूर्ती एच. एन. नागमोहन दास आयोगाच्या अहवालानुसार ही आरक्षणवाढ केली जाणार आहे. त्यात अनुसूचित जातीचे आरक्षण १५ वरून १७ टक्के व अनुसूचित जमातीचे आरक्षण ३ वरून ७ टक्के केले जाणार आहे. तशी शिफारस आयोगाने केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सर्वपक्षीयांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगाच्या शिफारसींची माहिती दिली. आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यातील अनुसूचित जाती व जमातींची आरक्षणवाढ केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दास आयोगाने केलेल्या शिफारशींवर बैठकीत चर्चा झाली. सर्वपक्षीयांनी त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे आता कर्नाटकात अनुसूचित जातीचे आरक्षण १७ टक्के आणि अनुसूचित जमातीचे ७ टक्के लागू होणार आहे. त्यामुळे ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली जाणार आहे. त्यासाठी घटना तज्ज्ञांचा सरकार सल्ला घेत आहे. मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी बोम्मई सरकारवर मोठा दबाव होता. वाल्मिकी गुरुपीठाचे आचार्य प्रसन्नानंद स्वामी यांनीही आरक्षणासाठी उपोषण केले. विरोधी पक्ष आणि खास करून काँग्रेसने याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे बोम्मई सरकारने हा निर्णय घेतला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami