संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

कर्नाळा पक्षी अभयारण्यात ट्रेकरचा हृदयविकाराने मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पनवेल – येथील कर्नाळा पक्षी अभयारण्यात एका ट्रेकर्सचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आज रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सुरेंद्र रवींद्र जाळीहाल (३८) असे या मृत ट्रेकरचे नाव असून तो पुण्यातील रहिवासी आहे. पश्चिमात्य घाटातील डोंगर रांगांमध्ये असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात अनेकजण ट्रेकिंग करण्यासाठी येत असतात. पुण्यातील ट्रेनेटी अ‍ॅडव्हेंचर ग्रुपचे २८ जण याठिकाणी ट्रेनिंगसाठी काल शनिवारी आले होते. या सर्वांचे आज सकाळी ट्रेकिंग सुरू असताना सुरेंद्र यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami