न्यूयॉर्क – ट्विटरचे नवे मालक इलाॅन मस्क यांनी कंपनीत माेठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. भारतातील या कंपनीच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. यावरून जाेरदार टीका हाेत आहे.याबाबत मात्र,कंपनीला दरराेज लाखाे डाॅलर्सचा ताेटा हाेत असल्यामुळे पर्याय नव्हता, असे मस्क यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मस्क यांनी ट्विट करून याबाबत कंपनीतील कर्मचारी कपातीबाबत आपली भूमिका मांडली आहे.भारतात सुमारे २०० हून अधिक कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश जणांना घरी बसविले आहे. तसेच भारतातील कर्मचाऱ्यांना किती सेवरंस पॅकेज दिले, याबाबतही नेमकी माहिती दिलेली आहे.ज्यांना काढलेले नाही अशांना सांगितले की, कर्मचारी कपातीदरम्यान तुमचा राेजगार प्रभावित झालेला नाही. पुढील आठवड्यात तुम्हाला माहिती देण्यासारखे आमच्याकडे बरेच काही राहणार आहे. ज्यांचे भवितव्य अधांतरी आहे अशांना ऑफिशियल आयडीवर मेल पाठविण्यात आला आहे. तुमच्या भूमिकेला पाेटेंशियल इम्पॅक्टेड म्हणून वेगळे केले आहे. तुम्ही काेणत्या देशात राहता, यावर पुढील निर्णय अवलंबून असेल. लवकरच अधिक माहिती तुम्हाला देऊ.ज्यांना काढण्यात आले आहे, त्यांना याबाबत कळविण्यात आले असून त्यांना ट्विटरच्या सिस्टीममधून काढण्यात आले आहे.जगभरात या कंपनीचे ७५०० कर्मचारी आहेत.त्यापैकी ३७३८ कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.