संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

कल्याणमध्ये चालत्या बसला अचानक आग लागल्याने खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कल्याण- कल्याणच्या नेतिवली परिसरात काल रात्री नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसने पेट घेतला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.बसला आग लागली त्यानंतर चालक-कंडक्टर यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
कल्याण पूर्व भागातील नेतिवली परिसरात नवी मुंबई महापालिकेच्या बसने अचानक पेट घेतला.त्यावेळी या बसमध्ये ५० प्रवासी होते.ही बस कल्याणहून नवी मुंबईच्या दिशेने चालली होती.आग लागल्यानंतर बसच्या चालक-कंडक्टरने सतर्कता दाखवली. चालक-कंडक्टर या दोघांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami