संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

कल्याणमध्ये रेल्वे रुळाला तडालोकलचे वेळापत्रक कोलमडले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कल्याण – मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली-कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान पत्रीपुलाजवळ आज सकाळी ६.३५ च्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे इंद्रायणी एक्सप्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकलचा खोळंबा झाला. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकाराचा फटका प्रवाशांना बसला. रेल्वे रुळाची दुरुस्ती केल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. मात्र लोकल विलंबाने धावत होत्या.
मध्य रेल्वेच्या कल्याण येथील पत्रीपुलाजवळ आज सकाळी पुण्याकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील रेल्वे रुळाला तडे गेले. त्यामुळे पुण्याकडे निघालेली इंद्रायणी एक्सप्रेस आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्या ठाकुर्ली, डोंबिवली आणि दिवा रेल्वे स्थानकात खोळंबल्या. कर्जत आणि कसाऱ्याकडे जाणाऱ्या जलद लोकल आणि इतर गाड्यांचाही खोळंबा झाला. रेल्वे रुळाची दुरुस्ती केल्यानंतर येथील वाहतूक सुरू झाली. मात्र लोकल ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत होत्या. याचा फटका प्रवाशांना बसला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami