ठाणे- कळवा स्टेशन रोडवरील नंदादीप सोसायटीजवळ असलेल्या एका भंगाराच्या गाळ्याला आग लागल्याची घटना काल रात्री पावणेबाराच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. हा गाळा अनुप सावंत यांच्या मालकीचा असून त्यांनी तो रेहमत्त अली यांना भाड्याने दिला होता. त्या गाळ्याला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, टोरंट विद्युत कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली व आगीवर नियंत्रण मिळविले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. या आगीत भंगाराच्या गाळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.