संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

कवी नारायण सुर्वे यांच्या
पत्नी कृष्णाबाई यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कवी नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई यांचे पहाटे चार वाजता निधन झाले. त्या 95 वर्षांच्या होत्या. सकाळी 11 वाजता त्यांची अंत्ययात्रा नेरळ येथून निघाली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कवी नारायण सुर्वे यांना कामगार, दलित आणि साहित्य विश्‍वात मास्तर नावाने ओळखले जात होते. तर कृष्णाबाई यांना ‘मास्तरांची सावली’ म्हणून ओळखले जायचे.
कृष्णाबाई सुर्वे यांचे मूळ नाव कृष्णाबाई तळेकर असे होते. त्यांचा जन्म मुंबई येथील गिरणगाव येथे झाला. नारायण सुर्वे हे स्वत: अनाथ होते. गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने त्यांना आपल्या घरी आणले आणि त्यांचे संगोपन केले. त्याचप्रमाणे कृष्णाबाई सुर्वे यांच्याही वडिलांचे निधन त्या सव्वा वर्षांच्या असताना झाले होते. अल्पावधीतच त्यांच्या आईनेही आत्महत्या केली. त्यानंतर कृष्णाबाई यांचा सांभाळ त्यांच्या आजीने मंगलदास चाळीमध्ये केला. लहानपणापासून कृष्णाबाई प्रचंड कष्टाळू होत्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami