संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

कशेडी घाटात भीषण अपघात १५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका मालवाहू ट्रकचा आज सकाळी भीषण अपघात झाला.चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक तब्बल १५० फूट दरीत कोसळला. या अपघातात चालक गंभीरित्या जखमी झाला असून त्याला तातडीने मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात केले आहे.
आज शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भोगाव गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की, ट्रक अंदाजे १५० फूट दरीत कोसळला.हा ट्रक आंध्र प्रदेशातील असून रोहा एमआयडीसीमध्ये क्लोरीन गॅसचे सिलेंडर घेऊन परत जात होता.कशेडी घाटातील भोगाव हद्दीतील तीव्र उतारावर हा ट्रक आला असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट १५० फूट दरीत जाऊन कोसळला. या भीषण अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला.अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला रुग्णालयात दाखल केले

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami