संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

कश्मीरात हिंदुत्व लादण्याचा प्रयत्न! मेहबुबा मुफ्ती यांची भाजपवर टीका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर : भाजपकडून कश्मीरमध्ये हिंदुत्व लादले जात आहे असा आरोप पीडीपीच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी कुलगाममधील एका सरकारी शाळेचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मुले ‘रघुपती राघव राजा राम’ हे भजन गात आहेत. यावर शाळेत मुस्लिम विद्यार्थ्यांना भजन गाणे अनिवार्य केले जात आहे, भाजप आपला अजेंडा राबवत असून जामा मशीदीत नमाज पठण करण्यास रोखले जात आहे असेही मुफ्ती यांनी स्पष्ट केले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना त्या पुढे म्हणाल्या मुस्लिम मुलांना शाळांमध्ये भजने गाण्यास भाग पाडले जात आहे. भाजप केवळ आपला अजेंडाच चालवत नाही तर तो लादला जात आहे. जामा मशिदीत लोकांना नमाज पढण्यापासून कसे रोखले जाते हे तुम्ही पाहिलेच असेल, असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याचे सरकारचे म्हणणे असले तरी वास्तव काही वेगळेच असल्याचे मुफ्ती म्हणाया. शिक्षकांना भजन गाण्यासाठी दबाव आणला जात आहे, आमच्या धर्मावर थेट हल्ला केला जात असल्याचे मुफ्ती म्हणाल्या. जम्मू कश्मीरमधील शांतता नष्ट करून जातीय तेढ निर्माण केला जात आहे अशी टीका मुफ्ती यांनी भाजपवर केली आहे. कलम ३७० हटवल्यानंतर सरकार कुणाला ना कुणाला तरी लक्ष्य करत आहे. आज भाजपच्या या वर्तणुकीमुळे कश्मीरवर याचे दुरगामी परिणाम होतील असा इशाराही मुफ्ती यांनी दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami