मुंबई- जे जे इस्पितळातील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांना वर्षानुवर्षे सेवेत कायम न करणे आणि लाभ न देणे हे सरकारचे अन्यायकारी आणि अप्रामाणिक धोरण असल्याचे सांगत आज मॅट कोर्टाने राज्य सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. तसेच या शेकडो कर्मचार्यांना चार आठवड्यांमध्ये शासनाचे सर्व लाभ अनफेअर लेबर प्रॅक्टिस सरकारने केली असे गृहीत धरून, संपूर्ण लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत. सदर निकालामुळे 1986 पासून कष्ट करणार्या दवाखान्यातील, झाडूपोता करणार्या सामान्य कष्टकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या केसमध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आणि अॅड. जयश्री पाटील यांनी या कर्मचारी, कामगारांची बाजू मांडली. सदर निकाल हा मुख्य न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी दिला आहे. तसेच चौथा वर्ग पास नसले तरी एवढे वर्ष कष्टकर्यांना त्यांच्याकडून काम करून घेताना शिक्षण दिसले नाही का? आणि आता त्यांच्या शिक्षणावर बोट ठेवता येणार नाही, असे म्हणत ताशेरे ओढत सरकारला न्यायालयाने सांगितले. नोकरीत या कष्टकर्यांना कायम करा. सदर कष्टकर्यांनी कोविडमध्ये काम केल्याने देखील न्यायालयाने प्रशंसा केली.