मुंबई – पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल शुक्रवारी थंडावल्या. काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या मिनिटापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून आता सर्वांचे लक्ष उद्या रविवार २६ फेब्रुवारी रोजी होणार्या मतदानाकडे लागले आहे.उद्या मतदान प्रक्रिया पार पडून २ मार्चला मतमोजणी होणार आहे. दरम्यान,आजही सर्वच पक्षांचे महत्वाचे नेते शहरात तळ ठोकून असल्याचे दिसून आले.
या दोन्ही मतदारसंघात मुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीस,अजित पवार, आदित्य ठाकरेंनी जाहीर सभा आणि पदयात्रा काढून जोरदार प्रचार केला आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूका होत आहेत.कसबा पेठमधून भाजपचे हेमंत रासणे आणि कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात तसेच चिंचवडमधून भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांच्यात लढत होणार आहे.