संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

काँग्रेसची संघावर टीका
भाजपात संतापाची लाट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. आज भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसने ट्विटरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील हाफ चड्डीचा एक फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये संघाची हाफ चड्डी जळत असल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच या फोटोवर ‘अजून 145 दिवस बाकी’ असेही लिहिले आहे. कॉँग्रेसच्या या ट्विटमुळे भाजपात संतापाची लाट उफाळून आली असून, नव्या वादाला तोेंड फुटले आहे. काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले की, आम्ही देशाला द्वेषाच्या वातावरणातून मुक्त करण्याच्या आणि आरएसएस-भाजपने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्याच्या दिशेने एकापाठोपाठ एक पाऊल टाकत आहोत. आम्ही आमच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहोत.
यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, ‘ही ‘भारत जोडो यात्रा’ नसून ‘भारत तोडो यात्रा’ आणि ‘आग आगाऊ यात्रा’ आहे. काँग्रेस पक्षाने हे पहिल्यांदाच केलेले नाही. मला राहुल गांधींना विचारायचे आहे की, तुम्हाला या देशात हिंसाचार हवा आहे का? काँग्रेसने हे चित्र तात्काळ काढून टाकावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भाजप खासदार तेजश्री सूर्या यांनी काँग्रेसच्या या ट्विटला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, हे चित्र काँग्रेसच्या राजकारणाचे प्रतिक आहे. ‘काँग्रेसच्या आगीमुळे 1984 मध्ये दिल्ली जाळली. 2002 मध्ये गोध्रा येथे 59 कारसेवकांना जिवंत जाळले. त्यांनी पुन्हा हिंसाचाराची हाक दिली आहे’, असे भाजप खासदाराने लिहिले आहे.
भाजपच्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसचे जयराम रमेश म्हणाले की, मला टी-शर्ट, अंडरवेअरबद्दल बोलायचे नाही. जर भाजपला कंटेनर, शूज आणि टी-शर्ट बद्दल मुद्दा काढायचा असेल तर ते या यात्रेला घाबरले आहेत. त्यामुळे ते काहीही बोलू शकतात हे दिसून येते. ‘झूठ की फॅक्टरी’ सोशल मीडियावर ओव्हरटाईम चालू आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, भाजपने काही दिवसांपूर्वी राहुल गांधींच्या टी-शर्टची किंमत 40 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचा दावा करत त्यासंबंधी एक ट्विट केले होते. काँग्रेसने भाजपला जशास तसे उत्तर दिले होते. अरे तुम्ही घाबरलात का? भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून. बोलायचे असेल तर बेरोजगारी आणि महागाई या विषयावर बोला. कपड्यांबद्दल चर्चा करायची झाली तर मोदीजींचा 10 लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा यावर चर्चा होईल. मग सांगा करायची का चर्चा, असे ट्विट करत काँग्रेसने भाजपवर पलटवार केला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami