नांदेड – काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नसीम खान यांच्या मोटारीला नांदेडजवळच्या भिलोली टोल नाक्यावर अपघात झाला. मात्र नसीम खान सुदैवाने त्यातून बचावले. त्यांच्या पायाला किरकोळ मार लागला. त्यांचा कारचालक अपघातात जखमी झाला आहे. नंतर ते दुसऱ्या कारने नांदेडला रवाना झाले.
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी नसीम खान हैदराबाद येथून कारने नांदेडला जात होते. शनिवारी सायंकाळी त्यांची कार नांदेडजवळच्या भिलोली टोल नाक्याजवळ आली तेव्हा समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारने समोरून धडक दिली. त्यात दोन्ही कारच्या बोनेटचा चुराडा झाला. मात्र सुदैवाने नसीम खान बचावले. त्यांचा चालक अपघातात जखमी झाला. या घटनेनंतर खान दुसऱ्या कारने नांदेडला रवाना झाले.