संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत
तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोटा: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये सुरू आहे. भारत जोडो यात्रेचा राजस्थानमधला आज (गुरुवार) चौथा दिवस आहे. या यात्रेला आज कोटामध्ये गालबोट लागले आहे. कोटामध्ये यात्रेत आज एका भाजपसमर्थक युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या तत्परतेने आग विझवली. पोलिसांनी त्यांची वर्दी उतरुन या युवकाची आग विझवली. या युवकाने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.झालावार रोडवरील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. युवकाच्या मनात काँग्रेसच्या धोरणाबद्दल प्रचंड नाराजी होती.‌त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते.या प्रकरणामुळे शांततेत पार पडलेल्या या पदयात्रेला कोटामध्ये गालबोट लागले.
भारत जोडो यात्रा आज सलग 24 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. भदाणा हा आजच्या यात्रेचा शेवटचा मुक्काम आहे. बुंदी जिल्ह्यातल्या केशोराईपाटन इथे राहुल गांधींच्या यात्रेसाठी कॅम्प लावण्यात आला असून, तिथे पुढील दोन दिवस रात्रीचा मुक्काम असणार आहे.
दरम्यान, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गेल्या काही दिवसांपासून वादाचा भोवऱ्यात अडकली आहे. कारण महाराष्ट्रात ही यात्रा सुरू असताना खासदार राहुल गांधी यांनी एका सभेत जनतेला संबोधित करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आता तरूणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami