संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

काँग्रेसच्या शिवकुमारांना दिलासा! चौकशीला 24 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बेंगळुरू- बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अडचणीत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना कर्नाटक उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. त्यांच्याविरोधातील सीबीआय चौकशीला न्यायालयाच्या न्यायमूर्ती के. नटराजन यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असताना 2013 ते 2018 या कालावधीत 74.93 कोटी रुपयांची शिवकुमारांनी बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सीबीआयने नुकतीच चौकशीची नोटीस बजावली असल्याचा दावाही शिवकुमारांच्या वकिलाने केला. गेल्या वर्षी जुलैमध्ये शिवकुमारांनी सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या