पुणे :- कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराची तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाराज असलेले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.
रविवारी संध्याकाळी सहा वाजता काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी पुण्यातील तरवडे हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत थोरातांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होईल. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरातांनी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता बाळासाहेब थोरात प्रचारासाठी ऍक्शन मोडमध्ये आहेत.