संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

कांजूरमार्ग येथील रॉयल पार्क इमारतीमध्ये भीषण आग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई शहरात आगीचे सत्र सुरुच आहे. ताडदेव, करी रोड पाठोपाठ आता कांजुरमार्गमध्येही एका बहुमजली इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कांजुरमार्ग येथे एका निवासी इमारतीला सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. एनजी रॉयल अपार्टमेंट या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर ही आग लागली असून बचाव कार्य सुरु आहे.

दरम्यान, इमारतीतील रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त दमोर आली नाही. मात्र इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लेवल २ ची ही आग असून अग्नीशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र तपासानंतरच कारण स्पष्ट होईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami