संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

कागल एमआयडीसीत वीज
पडल्यामुळे बगॅसला आग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर: कागल येथील पंचतारांकित एमआयडीसीतील ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बग्यास डेपोमध्ये गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास वीज पडल्याने आग लागली. १४५० मॅट्रिक टन बगॅस जळून खाक झाला आहे. सुमारे ५० लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे. डाव्या कालव्या शेजारी खासगी माळावर सुमारे ३० एकर परिसरात या कंपनीचे बगॅसचे ३५ डेपो आहेत. यामधील डेपो नंबर ९ मधील बगॅसच्या डेपोवर वीज पडली. बगॅसने पेट घेतल्याने धुराचे लोट पसरले होते. रात्रीपासूनच आग आटोक्यात आणण्यासाठी कर्मचारी वर्गाकडून प्रयत्न करण्यात येत होते. कागल नगरपरिषद, कोल्हापूर महानगरपालिका, स्वामी पाणीपुरवठा, कागल औद्योगिक वसाहत, जवाहर साखर कारखाना, श्रीराम पाणीपुरवठा आदींच्या अग्निशामक दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या