संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

कायदा पाळा, अन्यथा गाशा गुंडाळा! हाय कोर्टाचा ट्विटरला सज्जड दम

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हैदराबाद -भारतीय कायद्यांचे पालन करा. नाहीतर गाशा गुंडाळला, असा सज्जड दम आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला दिला. न्यायव्यवस्थे विरुद्धचा अपमानास्पद मजकूर प्लॅटफॉर्मवरून मागे घेण्याचा आदेश दिला असताना त्याचे पालन ट्विटरने केले नाही. त्यामुळे न्यायालयाने ट्विटरला कडक शब्दांत फटकारले. यावर पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा व न्यायमूर्ती सत्यनारायण मूर्ती यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ट्विटर आणि इतर सोशल मीडिया लपून-छपून भारतीय कायद्यांशी खेळू शकत नाही.

भारतात काम करायचे असेल तर या देशाच्या कायद्यांचे पालन केले पाहिजे. नाहीतर भारतातून गाशा गुंडाळावा, अशा शब्दांत न्यायालयाने ट्विटरला सुनावले. सोशल प्लॅटफॉर्मवरील न्यायालयासंबंधीचा अपमानास्पद मजकूर आदेश दिल्यानंतरही मागे का घेतला नाही, असा जाब न्यायालयाने विचारला. हे अवमान प्रकरण आहे. ट्विटरवर फौजदारी कारवाई होऊ शकते. असे सांगून न्यायालयाने यासंबंधी गुगल विरोधातील निकालाचा संदर्भ दिला. दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असलेल्या नागरिकांच्या अकाउंटवरून मजकूर हटवण्यात फक्त ट्विटरलाच अडचण येते का? असाही सवाल न्यायालयाने विचारला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami