संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

कायमस्वरूपी व्यवसायासाठी मुंबईतील डबेवाले उभारणार ‘डबेवाला सेंट्रल किचन’

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – मुंबईच्या डबेवाल्यावर अवलंबून सकाळी न्याहारी करून ऑफिसला निघालेल्या मुंबईकराच्या पुढ्यात दुपारी जेवणाचा डबा कोणत्याही परिस्थितीत पोहोचणारच,असा विश्वास गेली अनेक वर्षांपासुन मुबईकरांचा आहे. मात्र गेले दोन वर्ष लॉकडाउनमुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. पण त्यामुळे आता रडत-खडत न बसता मुंबईतील डबेवल्यांनी ग्राहकांना डबेवाल्यांकडून पौष्टिक जेवण खरेदी करता येईल, असा विचार करून सेंट्रल किचन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या नोकरदार वर्गाचा जिव्हाळ्याचा माणूस म्हणजे मुंबईचा डबेवाला होता. या मुंबईच्या डबेवाल्याने चाकरमान्यांच्या पोटाची खळगी गेली अनेक वर्षांपासून भरली आहेत. अत्यंत चोख आणि शिस्तबद्ध पद्धतीने केल्या जाणाऱ्या कामामुळे मुंबईच्या डबेवाल्यांची जगभरात ख्याती आहे. मात्र कोरोना काळात डबेवाल्यांचे सर्व जाळे विस्कटले. डबेवाल्यांवर मिळेल ते काम करण्याची वेळ आली. पण, त्यामुळे खचून जाईल तो मुंबईचा डबेवाला कसला. हा मुंबईचा डबेवाला आता नवीन रूपात मुंबईकरांच्या भेटीला येणार आहे.

कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांत डबेवाल्यांच्या व्यवसायावर झालेला परिणाम लक्षात घेता, त्यांनी आता ‘डबेवाला सेंट्रल किचन’ हा नवा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून डबेवाले आता मुंबईकरांच्या भेटीला येणार आहेत. या किचन व्यवसायाच्या माध्यमातून एका दिवसाला सुमारे ७० हजार ग्राहकांना जेवणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. डबेवाला किचनच्या माध्यमातून कायमस्वरुपी व्यवसायाची निर्मीती केली जाणार आहे.डबेवाला सेंट्रल किचनच्या माध्यमातून ग्राहकांना डबेवाल्यांकडून पौष्टिक जेवण खरेदी करता येईल. त्यामध्ये शाकाहारी, मांसाहारी जेवणाचाही समावेश असणार आहे. मुंबई शहरातील कोणत्याही भागातून ग्राहकांना संकेतस्थळावरून जेवणाची ऑर्डर नोंदवता येणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami