संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

काय हायवे , काय हाटेल सर्व कस ओक्के ! शहाजी बापूंच्या डायलॉगची पंकजालाही भुरळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड – शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या काय डोंगूर , काय झाडी , काय हा टील हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाला होता . या डायलॉगची बऱ्याच नेतेमंडळींनाही भुरळ पडलेली आहे. त्यामुळे भाषणाच्या वेळी काही नेते आवर्जून हा डायलॉग म्हणतात. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही या डायलॉगची भुरळ पडली आणि बीड मधील ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यात त्यांनी हा डायलॉग म्हणून दाखवताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून पंकजाला दाद दिली.

बीडच्या मांजरसूबा येथे ऊसतोड कामगार मुकादमांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात पंकजा मुंडे यांचेही भाषण झाले आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रीय हायवेच्या कामावर समाधान व्यक्त करीत शहाजी बापू पाटील यांचा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला डायलॉग बोलून दाखवला . त्या शहाजी बापूंच्या स्टाईल मध्ये म्हणाल्या काय हायवे, काय हाटेल सर्व कसे ओक्के! त्यांच्या या डायलॉगवर उपस्थितांनी टाळ्या वाजवूनत्यांना दाद दिली . दरम्यान त्यांनी आपल्या भाषणात ऊस तोड कामगार आणि मुकादमांच्या विविध समस्यांचा आढावा घेतला आणि या समस्यांचा आपण पाठपुरावा करीत असून त्या लवकरच सुटतील असा विश्वास व्यक्त केला

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami