संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

कार बॉम्बस्फोटाने काबुल हादरले! मशिदीजवळच्या स्फोटात ७ ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

काबूल- अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहर शुक्रवारी पुन्हा कार बॉम्बस्फोटाने हादरले. मशिदीजवळ झालेल्या या स्फोटात ७ जण ठार झाले असून ४१ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मुलांचाही समावेश आहे. या स्फोटाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानात वर्षभरात स्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत.

काबुल शहरातील मशिदीत शुक्रवारी काही नागरिक नमाज पडत होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला. त्याचा आवाज अनेक किलोमीटरवर ऐकू आला. स्फोटामुळे परिसर हादरला. काळ्या धुराचे लोट उसळले. स्फोटात ७ जण जागीच ठार झाले. त्यात काही मुलांचाही समावेश आहे. ४१ जण जखमी झाले असून त्यातील १४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती तालिबानचे प्रवक्ते अब्दुल नाफी टाकोर यांनी दिली. स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami