संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

कालव्यात गाडी कोसळल्याने
ज्येष्ठ लावणी कलावंताचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पंढरपूर – पंढरपूरजवळ फॉर्च्युनर गाडी 50 फूट खोल कालव्यात कोसळल्यानंतर काल रात्री उशिरा ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा अपघाती मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त होत असून या घटनेत तीन जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मोडलिंबकडून पंढरपूरकडे येताना काल रात्रीच्या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी 50 फूट खोल कालव्यात कोसळली. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदतकार्याला सुरुवात केली. गाडी ज्या कालव्यात कोसळली होती, त्या कालव्यात उतरायला जागा नसल्याने बचाव कार्य करण्यात अडथळे निर्माण होत होते. दोराच्या सहाय्याने जखमींना बाहेर काढले. काढून उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या अपघातात मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami