संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

काळजी घ्या! देशाची दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या पुन्हा २० हजारांच्या पार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढताना दिसत आहे. आज सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल २० हजार १३९ नवे रुग्ण आढळले. फेब्रुवारी महिन्यानंतर पहिल्यांदाच २० हजारांहून अधिक दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी देशात १६ हजार ९०६ नवे कोरोना रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत काल ३ हजार २३३ अधिक रुग्णांची भर पडली. तर, ३८ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता १ लाख ३६ हजार ७६ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत ४ कोटी ३० लाख २८ हजार ३५६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

कोरोनापासून संरक्षण म्हणून देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १९९ कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्या आहेत. तसेच भारतात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ४ कोटी ३६ लाख ८९ हजार ९८९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ५ लाख २५ हजार ५५७ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. महाराष्ट्रात बुधवारी २ हजार ५७५ नव्या रुग्णांची भर पडली. तर, ३ हजार २१० जण कोरोनातून बरे झाले आणि १० रुग्णांचा मृत्यू झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami