संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

काशिविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीत आढळली १७ व्या शतकातील शस्त्रे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वाई – येथील महागणपती घाटावर गणपती मंदिरासमोर असलेल्या काशिविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीत गाळ काढताना सतराव्या शतकातील कट्यार व खंजीर ही शस्त्रे आढळून आली. ही शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

येथील महागणपती मंदिरालगतच्या काशीविश्वेश्वर मंदिर परिसरात विहीर आहे. त्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असतो. या आडातील पाण्याचा अनेक वर्षात उपसा बंद असल्याने पाण्याला दुर्गंधी येत होती. मंदिराचे ट्रस्टी शैलेंद्र गोखले यांनी आडाची स्वच्छता करण्याच्या हेतूने गाळ काढण्यास मागील काही दिवसांपासून सुरुवात केली. दरम्म्यान, गाळ काढत असताना विहिरीत सात कट्यार आणि एक खंजीर आढळून आला.

याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ मंदिर परिसरात भेट देऊन पंचनामा करून शस्त्रे ताब्यात घेतली. याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, तहसीलदार रणजीत भोसले व सातारा येथील शिवाजी महाराज संग्रहाला कळविण्यात आले. विहिरीत सापडलेल्या शस्त्रांची छायाचित्र पाहून सतराव्या शतकातील असावीत असा अंदाज येतो. लवकरच ही शस्त्रे संग्रहालयाच्या ताब्यात घेण्यात येतील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami