संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

काशी विश्वनाथ गर्भगृहाला चढवला सोन्याचा मुलामा; पंतप्रधानांनी केली पूजा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वाराणसी – महाशिवरात्रीच्या आधी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याने मुलामा देण्याचे काम पूर्ण झाले आहे. गर्भगृह सोन्याने सजवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रथमच आतमध्ये प्रार्थना केली. महत्त्वाची बाब म्हणजे विश्वनाथ धाम पूर्ण झाल्यानंतर दक्षिणेकडील व्यापाऱ्याच्या मदतीने गर्भगृहाच्या भिंतींना सोन्याचा मुलामा चढवण्याचे कामही विश्वनाथ मंदिर प्रशासनाने केले होते, ते काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंती खूप जुन्या आणि जीर्ण झाल्यासारखे वाटत होते. याबाबत एका व्यापाऱ्याने अनेक प्रयत्न केल्यानंतर विश्वनाथ मंदिर प्रशासनाने परवानगी दिली. मंदिराच्या भिंतींची तांत्रिक तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये मंदिराच्या भिंती जुन्या झाल्यामुळे त्यांना सोन्याचे वजन उचलता येत नसल्याचे पूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, नंतर तांत्रिक पथकाने विशेष पट्टी वापरून त्यावर केमिकल टाकल्यानंतर त्यावर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला. यानंतर रविवारी पाहणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात विशेष पूजाही केली. महाशिवरात्री पूर्वी विश्वनाथांचे गर्भगृह सोन्याने सजवल्यानंतर भाविकांचे आणखी

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami