श्रीनगर- मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र आणि नजीकच्या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचे पाहायला मिळाले.मात्र आता ही थंडी काहीशी ओसरली असून वातावरणात काहीसा उकाडा जाणवत आहे.मात्र आता देशातील उत्तरेकडील राज्ये कडक थंडीत गारठू लागली आहेत. जम्मू-काश्मीरचा पारा तर शून्याच्या खाली घसरला आहे.७ डिसेंबरपर्यंत आणखी पारा घेण्याची शक्यता आहे.
दिल्लीमध्ये तापमान ७.९ अंशांवर असतानाच काश्मीरमध्ये पारा शुन्याच्याही खाली उतरला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उशीरा श्रीनगरमध्येही तापमान ० ते २.१ अंशांवर पोहोचले होते. यंदाच्या मोसमातील हे सर्वाधिक कमी तापमान ठरत आहे. तर,तिथे अमरनाथ वाटेवर असणाऱ्या पहलगाम येथे तापमान उणे ३.४ अंश,गुलमर्ग येथील प्रसिद्ध स्कि-रिसॉर्ट येथे १.० तर अनंतनाग जिल्ह्यातील कांजीगुंड येथे उणे १.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. तसेच काश्मीरमधील कुपवाडा उणे १.४ ,कोकरनाग ०.४, लडाखमधील लेह शहरात उणे ७.८ आणि द्रास येथे उणे येथे उणे ११.६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.