संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 04 July 2022

काश्मीरच्या बर्फाच्छादित भागात बूस्टर डोससाठी लष्कराने केला ड्रोनचा वापर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात, भारतीय लष्कर बर्फाळ भागात कोविड-१९ लसीचा बुस्टर डोस पुरवण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत. ड्रोनद्वारे बूस्टर डोस निश्चित ठिकाणी पोहोचवले जात आहेत.

मिशन संजीवनीच्या माध्यमातून ड्रोनच्या सहाय्याने दूरवर आणि दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना ड्रोनचा पुरवठा करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील शेतीला अत्याधुनिक बनवण्याच्या उद्देशाने शेतात कीटकनाशक फवारणीसाठी १०० शेतकरी ड्रोनचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे आधुनिक शेतीच्या दिशेने नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वर्षी १६ जानेवारी रोजी कोरोना महामारीविरूद्ध देशव्यापी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली होती. यामध्ये पहिल्या टप्प्यांत आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले होते. तर मागील वर्षातील फेब्रुवारी महिन्यापासून भारतीय जवानांना लसीकरण करण्यात आले होते.

यंदाच्या वर्षात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, जम्मू-काश्मीरमध्ये काल कोविडशी संबंधीत एकही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाहीये. तसेच काल दिवसभरात १५१ इतक्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

जानेवारी महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सर्वात कमी रूग्ण आढळून आले आहेत. तर १६६ रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. कोविडची तिसरी लाट २५ जानेवारी रोजी आल्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. तर ६ हजार ५७० इतके नवे रूग्ण आढळून आले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून २०० पेक्षा कमी रूग्ण प्रदेशात आढळून येत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami