संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तानी ड्रोन; शस्त्रे, स्फोटके आणि रसायन टाकले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याच्या हेतूने पाकिस्तानी ड्रोनने बुधवारी पुन्हा या भागात स्फोटके, हत्यारे आणि पहिल्यांदाच रसायने टाकली, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक दिलबाग सिंह यांनी दिली.

काही दिवसांपासून पाकिस्तानची ड्रोन भारतीय हद्दीत घुसखोरी करत आहेत. बुधवारी अशाच पाकिस्तानी ड्रोनने जम्मू-काश्मीरमध्ये हातबॉम्ब, स्फोटके, पिस्तुलं, दारूगोळा आणि पहिल्यांदाच लिक्विड रसायने टाकली. शांतता भंग करण्याच्या हेतूने पाकिस्तानमार्फत अशा कुरापती सुरू आहेत. यापूर्वी ड्रोनने हत्यारे आणि अंमली पदार्थ जम्मू-काश्मीरमध्ये टाकली होती. अंमली पदार्थाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर अतिरेकी कारवायांसाठी करावा हा त्यामागचा हेतू आहे. त्यानंतर बुधवारी शस्त्रे आणि स्फोटकांबरोबरच रसायने टाकली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami